हरवले आभाळ त्यांचे हो तयांचा सारथी....!! #babaamate #warora - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हरवले आभाळ त्यांचे हो तयांचा सारथी....!! #babaamate #warora

Share This
महान समाजसेवी "बाबा आमटे"यांनी फुलवलेल्या आनंदवनात कित्येकांना एक नवा "प्रकाश"मिळाला  आणि अनेकांनी आपला "विकास" साधला.याची प्रत्यक्ष प्रचिती देणारा विशेष लेख.

खबरकट्टा / विशेष बातमी (26 डिसेंबर 2019) : श्री. पराग भानारकर, नागभीड.

दुपारची वेळ होती.शाळेत मुलांचा मध्यान्ह भोजनाचा कार्यक्रम सुरू होता.शेवटी पोटाची भूक ही महत्वाची.रिकाम पोट हे बरच काही शिकवून जाते.. जगातला प्रत्येक सजीव हा पोटाची खळगी भरण्यासाठी सतत प्रयत्न शील असतो..!!

अश्यातच प्रत्येक विदयार्थी आणि शिक्षक  आपल्या कामात व्यस्त असताना अचानक पणे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेलं एक व्यक्तिमत्व शाळेच्या पटांगणात येतो विदयार्थी त्याच्या भोवती गोळा होतात.तो विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक कार्यालय कुठे आहे विचारतो... शोध संपतो,थांबतो.तो सांगतो की मी जन्मतः डोळ्यांनी अंध आहे.मी गावोगावी फिरून अगरबत्ती शाळा,कार्यालयात विकुन माझा उदरनिर्वाह चालवत असतो...!!

या व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे "इम्रान पठाण" राहणार सास्ती तालुका राजुरा..घरी दोघेच भाऊ दोघेही जन्मता अंध,आई वडील नाहीत. इम्रान यांनी डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवनात 10 वर्षे विविध प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट इम्रान सहज ओळखतो.त्याला कोणिही फसवू शकत नाही,चालताना घ्यायची काळजी,गंधावरून पदार्थ,पेय ओळखणे,नोटा कितीच्या हे सर्व तो अगदी व्यवस्थित करतो...!!
     
एकीकडे आपण पाहिलं तर अनेक अंध,अपंग लोक भीक मागून किंवा पैसे मागून आपला उदरनिर्वाह चालवत असतात नव्हे उदारीची जिंदगी जगत असतात मात्र इम्रान हे अगदी स्वाभिमानाचे जीवन जगत आहे.. "डॉ. बाबा आमटे"यांनी फुलवलेल्या आनंदवनात कित्येकांना एक नवा "प्रकाश"मिळाला  आणि अनेकांनी आपला "विकास" साधला.हे सगळं पाहून हे किती महान कार्य आहे याची महती यातून आम्हाला कळते..!!
     
सर्वप्रथम आम्ही सर्व शिक्षकांनी त्याच्याकडून अगरबत्ती विकत घेतल्या त्यानंतर सोबत चहा घेत अनेक गप्पा केल्या. इम्रान ला त्याच्या काही नातेवाहिक लोकाकडून त्रास आहे..इम्रान चा लहान भाऊ हा सुद्धा जन्मत अंध असल्याने त्याला सुद्धा सेन्सर युक्त काठी घेऊन द्यायची आहे.अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा माल हा इम्रान नागपूर येथून जाऊन आणतो स्वता बस ने 4 ते 5 जिल्ह्यात तो फिरत असतो आणि आपल्या व्यवसायातून तो आपला उदरनिर्वाह करीत असतो..!!!

       
खर तर इम्रान पठाण च्या या घेतलेल्या अगरबत्तीचा सुगंधाने आमचे देव्हारे प्रसन्न झालेत. खर तर सगळ्याच देवांना सगळे सारखेच आहेत."तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा".हे भजनात नाही का गात आपण.

इम्रान कडून खरे तर आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. ज्या डोळ्यांनी सारे जग पाहिले जाते ते डोळेच नसले तरी त्यावर मात करित इम्रान आपला आवाज ईश्वराकडे पोहचवतो आहे. माझ्या धडधाकट, तसच अपंगत्व आलेल्या बांधवांनी स्वाभिमानाने जगणे शिकाव हीच या इम्रान पठाण वर लिहत असलेल्या लेखाच्या माध्यमातून अपेक्षा.अनेक अपंगत्व प्राप्त झाल्यानंतर ही त्यावर मात करीत यशाच्या शिखरावर पोहचले हे वास्तव सुद्धा नाकारता येत नाही...!!

जीसने दुनियामे सच काम किया।ओ मंदिर गया न गया।।उसीने प्रभू नाम लिया न लिया।मंदिरी बैसुनी नाक दाबावे।।त्यापेक्षा मार्गातले काटे उचलावे।।दु:खिताशी पाणी पाजावे।हे तीर्थाहुनी श्रेष्ठ आहे।।-विश्वसंत तुकडोजी महाराज...!!


( लेखक हे सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड येथे सहायक शिक्षक असून ते आपुलकी फाऊंडेशन नागभीड चे संस्थापक  संचालक आहेत.लेखन हा त्यांचा आवडता छंद आहे)