खबरकट्टा /आर्णी ( यवतमाळ ) :
तालुक्यातील दहेली येथे कार्यरत तलाठ्यावर शनिवारी सकाळी अज्ञात तिघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना स्थानिक फॉरेस्ट ऑफिस, मोहनलाल मंगल कार्यालया समोर घडल्याने शहरात खळबळ उडाली.
ग्रामीण रुग्णालयांनी दिलेल्या माहितीनुसार, डवरे असे या तलाठ्याचे नाव असून तिघांच्या हल्ल्यात डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यवतमाळला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात संध्याकाळी दोन दिवस उलटूनही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही. पोलिसांना घटनेची माहिती होताच ग्रामीण रुग्णालय व घटनास्थळी चौकशी व सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अद्याप हमला कोणी व का केला हे समजू शकले नाही, असे ठाणेदार बाविस्कर यांनी सांगितले.