महाराष्ट्रतीन आघाड्या, तीन सरकार; अजित पवारच उपमुख्यमंत्री #ajitpawar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्रतीन आघाड्या, तीन सरकार; अजित पवारच उपमुख्यमंत्री #ajitpawar

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री होणार की, महत्वाचं कॅबिनेट मंत्री पद देणार यावर बरीच चर्चा रंगली होती. पण, शपथविधीच्या काही तास अगोदर त्यावरून पडदा दूर झाला. अजित पवार यांनी दीड महिन्याच्या अवधीतच दुसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री होण्याची अजित पवार यांची तिसरी वेळ आहे. यात ते तीन वेगळवेगळ्या पक्षांचं सरकार असताना त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. 

त्यामुळे अजित पवार आणि उपमुख्यमंत्रीपद यांचं खास नातं तयार झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कायमचं राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अगदी अलिकडेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार पक्षाचे गटनेते असताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचं सरकार स्थापन केलं. भाजपा-राष्ट्रवादीचं हे सरकार फार तग धरू शकलं नाही. 


प्रचंड मोठ्या राजकीय नाट्यानंतर चार दिवसांत हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. तीन आघाड्या, तीन सरकार राज्यात २००९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने सरकार स्थापन केले. राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद आलं होते. अजित पवार यांचं पक्षातील वजनही या काळात चांगलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेत पाठिंबा दिला. या चार दिवसाच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. या सरकारमध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमध्ये अजित पवारांकडील पद मात्र कायम राहिले आहे. अजित पवार-शरद पवार आणि सुप्त संघर्ष – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील एक सुप्त संघर्ष वारंवार चर्चेत येत राहिला आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार कुटुंबात दुफळी उफाळून आली होती. मात्र, अजित पवारांनी निर्णय बदलला. शरद पवार यांचा संयमी आणि मुत्सद्दी स्वभाव आहे. अजित पवारांचा स्वभाव याउलट आहे. तापट स्वभाव त्यांच्या चाहत्यांना आवडतो. मात्र, याच स्वभावामुळे अजित पवार चर्चेत राहिले आहेत. शरद पवारांवर ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर दिलेला राजीनामा असो, वा भाजपाला दिलेला पाठिंबा. त्याचबरोबर सत्तावाटपावरूनही अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला आहे.