कागदपत्र नसताना देखील तुम्ही बनवु शकता ‘Aadhaar’ कार्ड, ‘UIDAI’ चे नवे नियम लागू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कागदपत्र नसताना देखील तुम्ही बनवु शकता ‘Aadhaar’ कार्ड, ‘UIDAI’ चे नवे नियम लागू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

आधार कार्ड सध्या खूप महत्वाचे आहे. सरकारी काम असो वा खाजगी अनेक महत्वाच्या कामांमध्ये आधारकार्ड लागतेच. मात्र काही लोकांना कागदपत्रेच उपलब्ध नसल्यामुळे आधार काढता येत नाही अशा लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. युआयडीआयने ने एक स्टँडर्ड सर्टिफिकेट लागू केले आहे. अर्जदार हे सर्टिफिकेट आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींकडून मिळवू शकतात. या प्रमाणपत्रासाठी अर्जदाराला आपली योग्य माहिती देणे गरजेचे आहे.
            

या ठिकाणी मिळू शकते प्रमाणपत्र एका परिपत्रकानुसार विविध अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रमाणित स्वरूप नव्हते. ज्या लोकांकडे पुरेशी कागदपत्रे नाहीत, त्यांना यामुळे समस्या येत होती. हे पाहता प्रमाणपत्रांचे प्रमाणित स्वरूप तयार केले गेले आहे. ते खासदार, आमदार किंवा राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार किंवा शैक्षणिक संस्था प्रमुख किंवा नगरसेवक यांच्याकडून घेता येतील.

कागदपत्रे नसल्यामुळे व्यक्तीची ओळख, पत्ता आणि जन्म तारीख एकाच सर्टिफिकेट मध्ये द्यावे लागते. हे प्रमाणपत्र पदाधिकारी देऊ शकतात.

या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर मिळू शकते आधार
जर आपल्याकडे पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र इत्यादीचा पुरावा (पीओआय) असेल, तर पासपोर्ट, बँक स्टेटमेंट / पासबुक, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि जन्म पुरावा यासारख्या पत्त्याचा पुरावा (पीओआय) असेल तर आपण आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.