धानावर प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता - इतर शेतकरी मात्र अजूनही प्रतीक्षेत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धानावर प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता - इतर शेतकरी मात्र अजूनही प्रतीक्षेत

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे. 

सन २०१५-२० या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनानेकिमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धानउत्पादनाच्या ख्ात वाढ झाली आहे. त्यावर शेतकन्यांना दिलासा देणेआवश्यक होते. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास क्विन्टल च्या मदत प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतक-यांना२०१९-२०मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे.सत्तास्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी मदतीची घोषणा नझाल्याने शेतकरी हतबल झाले होते. अखेर आज मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी धान पिकाच्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. यामुळे कोकण आणि विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या मदती चा फायदा होणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना  याद्वारे दिलासा मिळणार असला तरी इतर शेतकऱ्यासाठी मदतीची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील उर्वरित शेतकरी मात्र मदती च्या प्रतीक्षेत आहेत.