बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला सडक्या अवस्थेत : 5दिवसांपूर्वी कुटुंबियांनी दाखल केली होती बेपत्ता तक्रार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला सडक्या अवस्थेत : 5दिवसांपूर्वी कुटुंबियांनी दाखल केली होती बेपत्ता तक्रार

Share This
नागभीड शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर गोसेखुर्द कॉलनीच्या मागे मुरूमच्या खदाणीजवळ एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड :

                 
नागभीड येथील ग्रामीण रुग्णालय जवळ  असलेल्या गोसेखुर्द कॉलोनी मागील परिसरातील मुरूम खदाणी जवळ सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींना दुर्गंधी आल्याने संशयास्पद स्थिती लक्षात येताच लगेच पोलीस स्टेशन ला माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता एका तरुणीचा कुजलेल्या स्वरूपातील मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली.

                  या तरुणीचा चेहऱ्याकडील भाग पूर्णता खराब होऊन चेहऱ्याकडील भाग पूर्णता खराब झालेला असल्याने सुरुवातीला ओळख पटविणे कठीण झाले. सध्या देशात हैद्राबाद येथील घटनेचे पडसाद पडत असतांना नागभीड येथे ही अत्याचार करून तरुणीचा निर्घृण खून तर केला नाही न अशी चर्चा रंगू लागली.


गावातील काही नागरिकांना काहीतरी सडकी वास येत असल्याने बघितले असता एक मृतदेह सडक्या अवस्थेत पडला होता, नागरिकांनी याची सूचना नागभीड पोलीसाना दिली.पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत त्या महिलेची ओळख वय 28 वर्षे सोनू म्हणून पटली.

सोनूचे वडील असलम खान पठाण यांनी 27 नोव्हेम्बर पासून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार 30 नोव्हेम्बरला दिली होती.पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली.अस्लम पठाण यांनी दिनांक 30/11/2019 रोजी नागभीड पोलीस स्टेशन ला 27/11/2019 पासून बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार दिली होती त्या नुसार मृतक सोनू अस्लम पठाण (28)  असल्याची वडीलाकडून वडिलांनी सुद्धा तो मृतदेह सोनूचा असल्याची कबुली दिली. 


मृतक सोनू अस्लम पठाण ही नागभीड येथील फकीर मोहल्यात राहत होती तिच्यामागे 1 मुलगी 1 मुलगा आहे.तिचा मृत्यू कश्याने झाला या मागचे गूढ अजून कायम आहे ही सर्व बाबी पोलीस तपासात निष्पन्न होणार.पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे