राज्यात येत्या 4 दिवसात गारपीट -पावसाची शक्यता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यात येत्या 4 दिवसात गारपीट -पावसाची शक्यता

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :थोडक्यात 


राज्यात येत्या चार दिवस पावसाळी स्थिती निर्माण झाली असून राज्यभरात येत्या 4 दिवसात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 


विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडयात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 आणि 24 डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 25 डिसेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात पावसाचा अंदाज आहे.