खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिला परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे निवडणूकरिता दिनांक ४ जानेवारी, २०१० रोजी विशेष सभा जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील कन्नमवार सभागृहात बोलाविण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम ५ च्या उपकलम (१)(२) जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिलाधिकारी यांनी यासंबंधातील आदेश जारी केले असून श्री. महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी, मूल यांना सदर आदेशान्वये जिल्ला परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे निवडणुकी करिता विशेष सभा घेण्याकरिता पिठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे.