उप कोषागार अधिकारी मोहन काळे 3 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उप कोषागार अधिकारी मोहन काळे 3 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :भद्रावती - कामाचे बिल मंजुरी करीता उप कोषागार अधिकारी मोहन काळे यांना 3 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार याने पळसगाव ढाळीचे बांधकामाचे 6 लाख 8 हजार 611 रुपये चौरादेवी मजगी पुनर्जीवन कामाच्या 1 लाख 37 हजार 378 रुपयांच्या देयकावर आक्षेप न नोंदविता उप कोषागार कार्यालयातून मंजूर करण्यासाठी उप कोषागार अधिकारी मोहन काळे यांनी तक्रारदाराला 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली,परंतु तक्रारदार यांना ही रक्कम काळे यांना देण्याची मुळीच इच्छा नव्हती म्हणून त्यांनी याबाबत लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार केली व काळे यांना तडजोड करून 3 हजार रुपये देण्याचे कबूल झाले.


आज उप कोषागार अधिकारी काळे यांना लाचेचे 3 हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली,सदरची कार्यवाही चंद्रपूर निरीक्षक निलेश सुरडकर, पोलीस हवालदार संतोष येलपुलवार, संदेश वाघमारे, नरेश ननावरे यांनी यशस्वी रित्या पार पाडली.