खबरकट्टा / महाराष्ट्र :
कन्हान-पिंपरी (जि. नागपूर)व गडचांदूर (जि.चंद्रपूर) नगरपरिषद आणि लांजा (जि. रत्नागिरी) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक, तर इतर विविध नगरपरिषद/नगरपंचायती मधील ल सहा रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ९जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे.मतमोजणी १० जानेवारी २०२०रोजी होईल, अशी माहिती राज्यनिवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी मंगळवारी दिली.या सर्वसंबंधित ठिकाणी मंगळवार पासून आचारसंहिता लागू झाली आहे.
नामनिर्देशनपत्रे १६ ते २० डिसेंबर२०१९ या कालावधीत सादरकरता येतील.त्यांची छाननी २१डिसेंबर २०१९ रोजी होईल.अपील २०१९ या कालावधीत सादरकरता येतील. त्यांची छाननी२१डिसेंबर २०१९ रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी २७ डिसेंबर२०१९ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेतायेतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेतायेतील.
मतदान ९ जानेवारी २०२०रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १०जानेवारी २०२० रोजी सकाळी १०वाजता सुरू होईल, असेही ते म्हणाले.रिक्तपदांसाठी पोट निवडणुकाहोणाऱ्या जागांचा नगरपरिषद/नगरपंचायतनिहाय तपशील : तळेगावदाभाडे (जि.पुणे)-७ब, देवळा(नाशिक)-११, भुसावळ (जळगाव)२४ अ, नेवासा (अहमदनगर)-१३नांदुरा (बुलडाणा)-७ ब आणिकळमेश्वर ब्राह्मणी (नागपूर)- हद्दवाढक्षेत्रासाठी.