2021 च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी ची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

2021 च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी ची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर ::सावली -
सन 2021 च्या राष्ट्रीय जनगणनेची तयारी सुरु करण्यात आली असून त्या नमुना फार्म मध्ये ओबीसी संवर्गात मोडणाऱ्या जातीचा व ओबीसी प्रवर्गाचा कुठेही उल्लेख दिसत नाही. ओबीसी संवर्गाची जात निहाय जनगणना स्वातंत्र्यपूर्व काळात 1931 ला करण्यात आली होती. त्यानुसार मंडल आयोगाने त्याचा संदर्भ घेऊन ओबीसींना 52 टक्के आरक्षण लागू केले.


त्यानंतर ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली नाही.त्यामुळे सन 2021 मध्ये स्वतंत्र ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.निवेदन देताना अविनाश पाल, दीपक जवादे, सतिश बोम्मावार, तुकाराम ठिकरे, प्रकाश गड्डमवार,दिलीप ठिकरे, अर्जुन भोयर, अरुण पाल, भुवन सहारे, गुरुदेव भुरसे, पुनम झाडे, भाऊराव कोठारे, तुळशीदास भुरसे, आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.