"खबरकट्टा -नवी पहाट" : 2020 या नववर्षाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा... !!! #happynewyear - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"खबरकट्टा -नवी पहाट" : 2020 या नववर्षाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा... !!! #happynewyear

Share This
खबरकट्टा - 1 जानेवारी 2020


नवी पहाट
सरले वर्ष जुने आता पहाट झाली नवीन वर्षाची
चांगले,सुंदर,छानसे घडेल सुरवात असेल नव्या पर्वाची.........!

"विसरून जाऊ वाईट सारे,निरोप त्याला देऊ
धरून चांगल्याची आस सोबत आपल्या घेऊ
राग,लोभ,आसुया,आकस, ह्याचे करू विसर्जन
आनंद,मैत्री,समाधान,शांती ह्याने भरू दे मन"

ईच्छा सर्वांच्या होतील पूर्ण सगळे असतील संतुष्ट
सुखाची होईल नांदी,कोणावरही येऊ नये आरिष्ट
मानवता करेल वास मनोमनी,जो तो जोडेल नवीन नाती.......!
समानता पसरून सगळीकडे नाहीश्या होतील जातीपाती..........!
निसर्गाचा असेल वरदहस्त,त्याचे होईल जतन
अभिमानाने म्हणू आपण हिंदुस्तान हैं हमारा वतन
  नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
🌹🌹🌹