"चंद्रपूर ची सौभाग्यवती- जागतिक सौंदर्यवती" : सौ. अरुणिता ढोलकीया "मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल 2019-20" - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"चंद्रपूर ची सौभाग्यवती- जागतिक सौंदर्यवती" : सौ. अरुणिता ढोलकीया "मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल 2019-20"

Share This
गौरव चंद्रपूरकरांचा : सौ. अरुणिता ढोलकीया "मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल 2019-20" 


श्रीलंका टुरिझम मंत्रालय द्वारे आयोजित जगभरातील 15 अंतिम स्पर्धकांत प्रथम सन्मान 

खबरकट्टा अभिनंदन ! : बघा  -सौ. अरुणिता ढोलकीया यांचा मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल 2019-20 चा  संपूर्ण प्रवास छायाचित्रांसहित... !
खबरकट्टा / चंद्रपूर : 


श्रीलंका टुरिझम मंत्रालय द्वारे आयोजित जगभरात मिस मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल 2019-20" ही स्पर्धा जगभरातील  70 पर्यटक देश असलेल्या, विविध देशात प्राथमिक फेरी घेण्यात आली होती. त्याची अंतिम फेरी 28 नोव्हेंबर  ते 1डिसेंबर 2019 पर्यंत श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे 5 फेऱ्यांत,  जगभरातून अंतिम निवडक 15 स्पर्धकांत घेण्यात आली.या अंतिम स्पर्धकांमध्ये चंद्रपूर येथील सौ. अरुणिता ढोलकीया यांची निवड झाली होती.
या स्पर्धेकरिता सौ.अरुणिता ढोलकीया परिवाराच्या आत्मविश्वास व तयारीनिशी आपल्या दोन लहान मुलांची जबाबदारी कुटुंबावर सोपवीत कोलंबो येथे अंतिम फेरीकरिता 28 नोव्हेंबर ला भारतीय स्पर्धक म्हणून  आपल्या प्रवासाला निघाल्या.
 फोटो : सौ.अरुणिता ढोलकीया,चेन्नई आंतराष्ट्रीय विमानतळ,  28नोव्हेंबर 2019दिवस पहिला (Day -1: 28 Nov): कोलंबो येथे (सायंकाळी स्पर्धेचे पहिले फोटोशूट नोगोम्बो या जगभरात सुप्रसिद्ध सागरी किनाऱ्यावर (बीच ) वर करण्यात आले. त्यातील निवडक छायाचित्रे... दिवस दुसरा : (Day 2: 29 Nov) : या दिवशी आयोजकांनी जगभरातून आलेल्या सर्व स्पर्धकांना श्रीलंका दर्शन घडवीत कोलंबो रॉयल पॅलेस ते शहर असे श्रीलंकन सांस्कृतिक वैविध्य पर्यटन घडविले व सायंकाळी सर्व स्पर्धकांकरिता अंतिम फेरी कार्यशाळा घेण्यात आली. दुसऱ्या दिवसाची निवडक छायाचित्रे -दिवस तिसरा :( Day 3 :30 Nov ) : 
 अंतिम दिवस (Final Day: 1 Dec ):
सौ. अरुणिता ढोलकीया "मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल 2019-20" प्रथम विजेता घोषित. 


टीम खबरकट्टा तर्फे "मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल 2019-20" सौ. अरुणिता ढोलकीया यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐