विधानसभेत आवाज गुंजला : 200 युनिट वीज मोफत हा आमचा हक्क ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विधानसभेत आवाज गुंजला : 200 युनिट वीज मोफत हा आमचा हक्क !

Share This
खबरकट्टा / थोडक्यात :
मागील अनेक वर्षापासुन चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार हे चंद्रपुरातील लोकांना दोनशे युनीट वीज मोफत मिळावी म्हणुन मागणी करत आहे. यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन केली आहेत. एक लाख पत्र त्यांनी यासाठी शासन दरबारी पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांपासुन सगळ्यांना निवेदन दिलेत. आणि आता आमदार बनल्यावर त्यांनी पहील्याच अधिवेशनात यासाठी सभागृहात आवाज उठवला आहे.  अधिवेशनाच कामकाजादरम्यान  जोरगेवार विधिमंडळात होते. संधी मिळताच त्यांनी जिल्ह्यातील नागरीकांना दोनशे युनीट मोफत मिळावी ही मागणी केली. चंद्रपुर जिल्हा हा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे. निर्माण केलीली वीज संपुर्ण महाराष्ट्रात जाते आणि त्याबदल्यात शहरवासीयांना मात्र प्रचंड प्रदुषण सहन करावे लागते. आरोग्याच्या अनेक समस्या इथल्या नागरीकांना भेडसावत आहे त्यामुळे त्यांचे जीवनमान कमी होत आहे.त्याचा मोबदला म्हणुन तरी सरकारने जिल्ह्यातील लोकांना घरगुती वापरातील दोनशे युनीट वीज मोफत द्यावी त्यासोबतच महाग वीज मुळे इथले उद्योग बाहेर जातात म्हणून उद्योगांनाही सवलतीच्या दरात वीज मिळावी , आणि जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांना देखील मोफत वीज मिळावी मागणी त्यांनी काल विधानसभेत केली.ही केवळ सुरवात आहे यानंतर प्रत्येक वेळी दोनशे युनीटची मागणी करतच राहणार आणि त्यासाठी आंदोलन करणार, असंही त्यांनी बोलतांना सांगितलं.

ब्रेकींग : भांगडिया भाजपा सोडण्याच्या तयारीत ? : अजित पवारांच्या गुप्त भेटीने राजकीय चर्चांना उधाण !