जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदांच्या निवडणुका 20 डिसेंबर पूर्वी : जिल्हाधीकाऱ्यांना ग्रामविकास विभागाच्या सूचना. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदांच्या निवडणुका 20 डिसेंबर पूर्वी : जिल्हाधीकाऱ्यांना ग्रामविकास विभागाच्या सूचना.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राज्यातील काही जिल्हा परिषद अध्यक्ष व उप अध्यक्ष, विषयी समिती सभापती व उप सभापती या पदाच्या निवडणुका ऑगस्ट 2019 मध्ये एकशे वीस दिवसांकरिता पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या ऑगस्ट 2019 महिन्यात राज्यातील काही जिल्हा परिषदचे अध्यक्ष,उपअध्यक्ष, विषयी समितीचे सभापती,पंचायत समिती सभापती उप सभापती या पदाचा निवडणुका होणार होत्या मात्र या निवडणुका सन 2019 च्या महाराष्ट्र अध्यादेश क्र,22 दिनांक 23/8/2019 अन्वेय 120 दिवसाच्या कालावधीसाठी तात्पुरत्या पुढे ढकलण्यात आल्या. तरी या अध्यादेशानव्ये एकशे वीस दिवसाच्या कालावधी हा दिनांक 20/12/2019 रोजी समाप्त होत आहे. त्या अनुशंगाने सदर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपअध्यक्ष,आणि विषयी समित्यांचे सभापती आणि पंचायत समिती चे सभापती व उप सभापती या पदाच्या निवडणुकी बाबत राज्यातील काही जिल्हा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुढील निवडणुकीचा कारवाई करण्यात यावी असे सूचना आदेश श्री, आर, ए. नागरगोजे,  ग्राम विकास विभाग, उपसचिव, महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात आली आहे.