खबरकट्टा /गडचिरोली - आष्टी :
अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी संदीप संतोष नागापुरे (२०) रा. इल्लुर, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली यास आष्टी पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. याबाबत पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन आष्टी येथे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची १३ वर्षाची मुलगी सकाळपासून घरी उपस्थित नव्हती.
तिला इल्लुर येथील संदीप संतोष नागापुरे (२०) हा सकाळी दुचाकीवरून फुस लावून पळवून घेऊन जात असताना पीडितेच्या आजीने पाहिले होते, असे पोलिसांना सांगितले. आष्टी पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन सादर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस शिपाई बालाजी येलकुंचिवार व पोलीस चालक प्रदीप चवरे हे इल्लुर येथे पोहचले.
तेथे जाऊन गोपनीय बातमीदारास यातील आरोपीच्या घरी जाऊन तो सद्या कुठे आहे याबाबत माहिती काढण्यास सांगितली. त्यावरून काही वेळातच गोपनीय माहितीदाराकडून माहिती प्राप्त झाली की त्यातील आरोपी नागापुरे हा सकाळी गावातील पत्रु शेंडे याच्यासोबत धाबा येथे नातलगाच्या साक्षगंधाकरिता गेला. त्याचवेळी ठाणे अंमलदार सुरेश दुर्गे यांनी फोनवर सांगितले की, सदर दुचाकी पत्रु शेंडे हे घेऊन आला. त्यावरून पत्रु शेंडेला ताब्यात घेतले व त्याला विचारपूस केले असता आम्ही सकाळी साक्षगंधाकरिता निघालो, त्यानंतर पीडितेला आष्टी चौकातून त्याच कार्यकमाला नेले व आटोपल्यावर संदीपने सांगितले की, सोनी चुदरी याच्या घरी थांबणार आहे.
त्यावरून आष्टी पोलीस व धाबा पोलिसांना सोबत घेऊन सोनी चुदरी याच्या घरी जाऊन झडती घेतली असता आरोपी व पीडिता मिळून आले व त्यानंतर त्यांना आष्टी पोलीस स्टेशनला आणले व त्यानंतर संदीप संतोष नागापुरे याच्यावर आष्टी पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३, ३७६ (२) (एन) पोस्को ४, ६, १२ नुसार गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई व पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक समू चौधरी, पोलीस शिपाई बालाजी येलकुंचिवार, चालक प्रदीप चवरे करीत आहेत.