गडचांदुर निवडणूक विशेष: 2 : नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी फाईट...! #gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदुर निवडणूक विशेष: 2 : नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी फाईट...! #gadchandur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर - (नगरपरिषद निवडणूक विशेष भाग - 2)
निवडणुकीचे वातावरण तापले असून उमेदवारांनी घरोघरी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष जनतेच्या मताधिकारातून निवडला जाणार आहे. दरम्यान, शिवसेनेने सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग करत शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पक्ष व संभाजी ब्रिगेड यांच्याशी आघाडी करत नगरविकास आघाडी स्थापन केली. 

या नगरविकास आघाडीकडून संध्या गजानन मेश्राम या उमेदवार आहेत. त्यांचे पती मुस्लिम समाजातील बडे प्रस्थ मानले जाते. जर मुस्लिम समाजाचे एकगट्टा मतदान या नगरविकास आघाडीला मिळाले तर त्यांचा विजय सुनिश्चित मानला जात आहे. कारण, गडचांदुरात  मुस्लिम मतदारांचा आकडा 4हजारच्या वर आहे. तर, इतर पक्षाच्या साथीने ही उमेदवारी नगराध्यक्ष पदाकरिता प्रबळ झाली आहे.दुसरीकडे मुस्लिम समाज हा बहुतांश काँग्रेसच्या बाजूने राहिल असा विश्वास तेथील स्थानिक काँग्रेस नेत्यांना आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून सर्व पक्षांच्या अगोदर काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला होता. त्यामुळे या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सविता टेकाम या प्रचारात अग्रेसर दिसत आहेत. अरुण निमजे व पापय्या पोन्नमवार यांच्यासारखे तरबेज नेते या आघाडीच्या उमेदवाराकरिता व्यूहरचना आखत आहेत.


तर, भाजपाकडून सौ. रंजना सुधाकर मडावी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. मडावी यांना शहरातील  सर्वपक्षीय अनेक  चांगल्या  व्यक्तिगत संबंधाचा फायदा होईल असा कयास आहे.  अहीर व मुनगंटीवार हे दोन्ही गट सध्या एकत्रित काम करताना दिसत असून राष्ट्रवादीतुन भाजपात आलेल्या डोहे व ताजने या नेतेमंडळीमुळे ही उमेदवारी देखील 'रेस' मध्ये आहे. आणि सर्वात महत्वाचे इतर पक्षातील बंडखोरी व गटबाजीचा देखील या उमेदवारीला फायदा होताना दिसतोय. 


दरम्यान नगराध्यक्ष पदाकरिता तिरंगी लढत होणार असून यामध्ये नेमकी बाजी कोण मारेल..? हे बघणे महत्वाचे ठरेल.