सिकलसेल जनजागरण रॅली : 17 डिसेंबर 2019 - सकाळी 9 वाजता - स्थळ : गिरनार चौक चंद्रपूर येथून - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिकलसेल जनजागरण रॅली : 17 डिसेंबर 2019 - सकाळी 9 वाजता - स्थळ : गिरनार चौक चंद्रपूर येथून

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

श्री साई सिकलसेल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने सिकलसेल आजाराच्या जनजागृतीसाठी चंद्रपूर शहरात आज दिनांक 17 डिसेंबर 2019, मंगळवारी जनजागरण रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक प्रा. विजय निरंजने यांनी काल चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
            
गिरणार चौकातील छोटूभाई पटेल हायस्कूल येथून सकाळी ९ वाजता ही रॅली निघणार आहे. गांधी चौक, जटपुरा गेट व्हाया परत गिरणार चौकात रॅली पोहोचून येथे मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. 

यात शालेय विद्यार्थी, सिकलसेलग्रस्त रुग्ण सहभागी होणार आहे. सिकलसेलग्रस्तांमधला न्यूनगंड कुठेतरी कमी व्हावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, जीवनात यशस्वीतेसाठी वाटचालीकरिता बळ मिळावे या हेतूने ही रॅली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अडीच हजारावर सिकलसेल पीडित तर साडे सात हजारांवर सिकलसेल वाहक असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भोला मडावी, डॉ. नागरकर, कृष्णा मसराम, मेश्राम आदी उपस्थित होते.