खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा पंचायत समितीमधील सभापतींची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला यासाठी सोडत पद्धतीने आरक्षण करण्यासाठी दिनांक 16/12/2019 रोजी सोमवारला दुपारी 12:30 वाजता, नियोजन भवन, जिल्हाधीकारी कार्यालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सर्व 15 पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचित केले आहे.