16 ते 21 असे एक आठवडाच अधिवेशन? सभागृहाचा वेळ सोडून मुख्यमंत्री आणि सहा मंत्री हजारो निवेदने स्विकारणार का? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

16 ते 21 असे एक आठवडाच अधिवेशन? सभागृहाचा वेळ सोडून मुख्यमंत्री आणि सहा मंत्री हजारो निवेदने स्विकारणार का?

Share This
यावेळी 16 ते 21 असे एक आठवडाच अधिवेशन चालणार असल्याची माहीती आहे. तरीही हा खर्च कोट्यवधी रुपयांचा असणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना जर मंत्री भेटूच शकणार नसतील, तर हा खर्च वाया नाही का जाणार, असाही प्रश्‍न उपस्थित होतोय. त्यामुळे सोबतच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचीही मागणी होत आहे.

खबरकट्टा /नागपूर : 

विदर्भातील लोकांसाठीच हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. येथील लोकांना आपल्या सरकारला भेटायचे असते. हजारो लोकांना आपल्या विविध मागण्यांची निवेदने मंत्र्यांना द्यायची असतात. आता यावेळी सभागृहाचा वेळ सोडून मुख्यमंत्री आणि सहा मंत्री हजारो निवेदने स्विकारणार का, असा प्रश्‍न जनतेकडून विचारला जातोय.

अधिवेशनावर प्रचंड खर्च होतो. सचिवालयांचे अधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, हजारो वाहने नागपुरात दाखल होतात. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची आणि इतर व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. अधिवेशनावर 27 हजार रुपये प्रतिमिनीट खर्च होतो, अशी माहीती आहे. यावरुन दोन, तीन आठवडे चालणाऱ्या अधिवेशनात होणाऱ्या खर्चाचा अंदाज येऊ शकतो. 

पण यावेळी 16 ते 21 असे एक आठवडाच अधिवेशन चालणार असल्याची माहीती आहे. तरीही हा खर्च कोट्यवधी रुपयांचा असणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना जर मंत्री भेटूच शकणार नसतील, तर हा खर्च वाया नाही का जाणार, असाही प्रश्‍न उपस्थित होतोय. त्यामुळे सोबतच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचीही मागणी होत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दोघेही विदर्भातीलच नागपुरचे आहेत. विदर्भाचे प्रश्‍न या दोघांकडूनही आजपर्यंत प्रश्‍न कळकळीने मांडले गेलेले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची भूमिका घेतील का, याकडेही जनतेच्या नजरा लागलेल्या आहेत.