विद्युत टॉवर वरून पडून 15वर्षीय मुलाचा मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विद्युत टॉवर वरून पडून 15वर्षीय मुलाचा मृत्यू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -काल दिनांक 7 डिसेंबर 2019 रोजी चिमुर तालुक्यातील शंकरपुर येथील शिवम मनोहर भानारकर वय 15 वर्ष या विद्यार्थ्यांचा शेतातील विद्युत टॉवर वरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटन घडली आहे.

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की शंकरपूर येथिल शंकर खिरटकर या शेतकऱ्याची भीसी रोड च्या बाजूला शेती आहे. त्या शेतामध्ये पॉवर ग्रीड विद्युत  टॉवर  आहे. या टॉवरवर शिवम खेळायला चढला असता अचानक त्याचा तोल गेला आणि तिथून खाली पडून शिवमचा दुर्दैवी मृत्यू झाला.

लगेच ही घटना जवळच शेती लागून असलेले शेतकरी वसंता कोल्हे यांना  बाजूच्या शेतात काम करीत असतांना आवज आला त्यानंतर  तिकडे धाव घेतली  असता तिथे शिवम हा पडला होता.परंतु  शिवमचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.अशी माहिती संबधीत शेतकऱ्यांकडून मिळाली आहे.त्यांनी लगेच पोलीस चौकी शंकरपुर व शेजारी शेतकरी खिरटकर यांना माहिती दिली.पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदणा करीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले.शिवम हा नेहरू विद्यालयात नवव्या वर्गात शिकत होता. वडील पेंटिंगचे काम करीत असून आई गृहिणि आहे .त्याला एक मोठा भाऊ असून घरातील शिवम हा लहान लाडका मुलगा गेल्याने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जांभळे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार लोटकर व शिपाही नागरगोचे करीत आहेत.