कापूस वेचाईच्या शेतमरुजूरांचा भीषण अपघात : महिला ठार -15 जखमी #roadaccident #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कापूस वेचाईच्या शेतमरुजूरांचा भीषण अपघात : महिला ठार -15 जखमी #roadaccident #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -




आज सायंकाळी राजुरा तालुक्यातील देवाडा (सिद्धेश्वर)  येथे शेतमजुरांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन त्यात गोंडपिपरी तालुक्यातील चिरोली जवळील कासलपेठ येथिल उषा सखाराम चौधरी ही महिला जागीच ठार झाली असुन सोबत असलेल्यापैकी जवळपास 15 इतर महिला पुरुष मजूर जखमी झाले आहेत. 



जखमींना तातडीने राजुरा येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात असून इतर जखमींची नावे नंदा वाढई, प्रल्हाद निमगडे, सुनिल वाढई,  राजु कवठे, जितेंद्र वाळके, नंदा कोडापे, सखाराम चौधरी, वनिता निकोडे, पुंडलिक निकुरे, अशा गुरुनुले, वर्षा वाळके, आशा मडावी, अश्विनी मडावी, रूपेश काळे आहेत. अधिक  राजुरा पोलिस घटनेचा तपास करत आहे.