सीपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी संघ सज्ज : खेळाडूंचा लिलाव, 14 जानेवारीपासून टी-20 चा थरार : सर्वाधिक 3500 पॉईंटची बोली रोहित वैद्य या खेळाडूवर !! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सीपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी संघ सज्ज : खेळाडूंचा लिलाव, 14 जानेवारीपासून टी-20 चा थरार : सर्वाधिक 3500 पॉईंटची बोली रोहित वैद्य या खेळाडूवर !!

Share This
चंद्रपूर : जिल्ह्यातील लोकप्रिय सीपीएल या क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंची आज लिलाव प्रक्रिया उत्साहात पार पडली. 15 संघमालकांनी  240 खेळाडू यातून निवडून आपला संघ सज्ज केला.लाईफ फाउंडेशनच्या वतीनं सीपीएल ही लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा मागील दहा वर्षांपासून आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचं हे सातवं पर्व आहे. एकूण 16 संघ या स्पर्धेत खेळणार असून 14 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्या ही स्पर्धा पोलीस फूटबॉल मैदानावर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंची नोंदणी केल्यानंतर आज सिद्धार्थ प्रीमिअर हॉटेलमध्ये लिलाव (ऑक्शन) करण्यात आला. सकाळी 11 वाजता जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी गजानन कामडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. 


प्रत्येक संघ 15 खेळाडूंचा असल्यानं तेवढ्या खेळाडूंची निवड यातून करण्यात आली. या लिलावात सहभागी संघमालकांना प्रत्येकी 10 हजार पॉईंट देण्यात आले होते. त्यातून त्यांना खेळाडूंची बोली लावायची होती. यात सर्वाधिक म्हणजे 3500 पॉईंटची बोली रोहित वैद्य या खेळाडूवर लागली.


या लिलाव प्रक्रियेचे संचालन लाईफ फाऊंडेशनचे पदाधिकारी कमल जोरा, वसीम शेख, डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी केले. या आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी सुनील रेड्डी, बॉबी दीक्षित, नाहीद सिद्दीकी, आरिफ खान, शैलेंद्र भोयर, हर्षल भगत यांनी सहकार्य केलं.