श्रमिक एल्गार तथा आम आदमी पार्टी चंद्रपूर (ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्र) रान धरणा-यांचा मेळावा ( कोसा उत्पादकांचा मेळावा ) येत्या 10 डिसेंबर रोजी पाथरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
पाथरी परिसरात कोसा उत्पादकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्यांच्या प्रश्नांवर व समस्यांवर विचार विनिमय करुन व्यवसायाला व संरक्षण देण्यासाठी व मदत करण्यासाठी पहिल्यांदाच रान धरणाऱ्यांचा (कोसा उत्पादकांचा ) मेळावा दि . १० डिसेंबर २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त मौजा पाथरी, (ता. सावली , जि . चंद्रपूर) येथे आयोजित करण्यात येत आहे. मंगळवार, दि . १० डिसेंबर रोजी दुपारी १२ . ०० वाजता स्थळ : संत तुकाराम कनिष्ठ कला महाविद्यालय, पाथरी येथे मेळावा होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य समिती सदस्य एड. पारोमिता यांची उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रमिक एल्गारचे अध्यक्ष राजेश्वर सहारे यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अनिल मडावी, शशिकांत बतकमवार , बाळकृष्ण दुमाने , निलेश गांगरेड्डीवार , श्रावण आगरे , मंगला आवारी , किसन दुमाने , मारोती दुमाने , अशोक मेश्राम , दत्त भोयर , लहुकांत मेश्राम , विठ्ठल गेडाम , यशवंत ठाकरे , साईनाथ दुमाने , गिरीधर शेन्डे , सूर्यभान वाघधरे , कवडू भोयर , दादाजी बावणे , दयाराम कोल्हे , हरि बावणे , भगवान मेश्राम, वासुदेव मेश्राम शकुतला मेश्राम , विलास जराते , दादाजी बावणे यांनी केले आहे.