10 रुपये किलो दराने कांदा विकणाऱ्या दोन तरुणांना अटक ! #Two arrested for selling Rs 10 / kg onion! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

10 रुपये किलो दराने कांदा विकणाऱ्या दोन तरुणांना अटक ! #Two arrested for selling Rs 10 / kg onion!

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -

स्वस्तात कांदा विकणाऱ्या दोन तरुणांना तुरुंगात जावं लागलं आहे. या दोघांनी 10 ते 20 रुपये किलो दराने कांदा विकला होता. इतक्या स्वस्तात कांदा मिळत असल्याने लोकांनी तो भरपूर प्रमाणात विकत घेतला आणि काही मिनिटांमध्येच या तरुणांकडे असलेला सगळा कांदा संपला.


अजय जाटव आणि जितू वाल्मिकी अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांनी जवळपास 50 किलो कांदा विकल्याचं सांगण्यात येत आहे.

या दोघांना स्वस्तात कांदा विकला म्हणून अटक झाली नसून त्यांना ही अटक चोरीचा कांदा विकल्याने झाली आहे. अजय आणि जितू हे दोघे एका गोदामात घुसले होते. तिथून त्यांनी कांदा आणि लसूण चोरले होते. यातील कांद्याची किंमत ही जवळपास 60 हजार रूपये इतकी होती. या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात उभं करण्यात आलं ज्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या दोघांना बऱ्याच मेहनतीनंतर शोधलं आणि अटक केली. अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. जानकीगंज पोलीस ठाण्यात या दोघांनी आपणच गोदामातून 50 किलो कांदा आणि लसूणाच्या दोन गोण्या चोरल्याचं मान्य केलं. कांद्याच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झाल्याने आपण ही चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.