मोदी सरकारकडून एका मोठ्या प्रकल्पावर काम सुरु आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. तसेच, तुमचा पेट्रोलवरचा खर्च 10 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. यामुळे सरकारी खजिन्यात 5 हजार कोटींची बचत होईल.
सरकार देशभरात मिथेनॉल ब्लेंडेड इंधन आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रदूषणात 30 टक्के घट होऊ शकते. यासाठी नितीन गडकरींनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिलं आहे.
मिथेनॉलयुक्त पेट्रोल; 65 हजार किमी ट्रायल रन पूर्ण :
सरकार देशभरात मिथेनॉल ब्लेंडेड इंधन आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रदूषणात 30 टक्के घट होऊ शकते. यासाठी पुण्यात मारुती आणि हुंदाई गाड्यांमध्ये मिथेनॉलयुक्त पेट्रोल टाकून 65 हजार किमी ट्रायल रन करण्यात आली. यानंतर देशभरातल्या पेट्रोल पंपांवर मिथेनॉलयुक्त पेट्रोल मिळू लागेल, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी दिली.