सावकार राजेंद्र उर्फ प्रकाश जयस्वाल विरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हे दाखल : दीड टक्के व्याजाचा परवाना काढून अतिरिक्त 10% व्याज वसुली. फिर्यादी रितेश गंधारे कडून 80लाखाच्या मुद्दलचे तब्बल 2 कोटी 91लाख वसूल करूनही मानसिक, सामाजिक प्रताडना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सावकार राजेंद्र उर्फ प्रकाश जयस्वाल विरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हे दाखल : दीड टक्के व्याजाचा परवाना काढून अतिरिक्त 10% व्याज वसुली. फिर्यादी रितेश गंधारे कडून 80लाखाच्या मुद्दलचे तब्बल 2 कोटी 91लाख वसूल करूनही मानसिक, सामाजिक प्रताडना

Share This
आर्थिक व्यवहारासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या राजेंद्र उर्फ प्रकाश जयस्वाल,त्याची पत्नी आणि अन्य सहकाऱ्या विरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून रामनगर पोलीस ठाण्यात 420, 406, 468 471, 506, 34 या विविध कलमाखालीगुन्हे दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी जयस्वाल व इतरांना अटक करण्याची मागणी रितेश  गांधारे आणि त्याची पत्नी उज्ज्वला गंधारे यांनी  चंद्रपूर येथे आयोजित  पत्रकार परिषदेत शुक्रवारी केली.

खबरकट्टा / चंद्रपूर : सविस्तर वृत्तानुसार रितेश गांधारे आणि राजेंद्र जयस्वाल यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध मात्र होते. राजेंद्र जयस्वाल हे सावकारीचा व्यवसाय करतात. रितेश गंधारे यांनी जयस्वालकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची सिक्युरिटी म्हणूनरितेश गंधारे यांनी जयस्वालकडे कोरे धनादेश, कागदपत्र व मुद्रांकपेपर आणि मालमत्तेची कागदपत्रे ठेवली होती. कर्जाच्या मोबदल्यात 2 कोटी 91 लाखांचे व्याज दिल्यानंतरही तो दहा टक्के दराने मासिक व्याज वसूल करीत होता,असा आरोप गंधार दाम्पत्याने केला आहे.

कालांतराने गंधारेने कर्जाची रक्कम व त्यावरील व्याजाचाहिशोब जयस्वालला मागितला.मात्र, जयस्वाल यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. कर्जाच्या रकमेचे दहापट अधिक व्याज दिल्यानंतरही जयस्वाल मोठी रक्कम मागत होता. यासाठी सिक्युरिटी म्हणूनठेवलेले कोरे धनादेश व अन्य कागदपत्राच्या आधारे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत होता. एका फ्लॅटवर अवैध ताबा मिळविण्याचाही जयस्वालने प्रयत्न केल्याचा आरोप गंधारे व त्याच्या पत्नीने काल पत्रकार परिषदेत केला.जयस्वालकडे असलेल्या कोरे धनादेश आणि कागदपत्राच्या आधारे खोटे आरोपा खाली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हे दाखल करून घेतले. यात गंधारे यांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान, गंधारे यांनी प्रकरणात न्यायालयात धाव घेत जयस्वाल यांनी कोरे धनादेश आणि कागदपत्राच्या आधारे राजेंद्र जयस्वाल त्याची आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला होता.दखल घेत न्यायालयाने राजेंद्र उर्फ प्रकाश जयस्वाल व अन्यव्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यातयावे असे आदेश निकालात दिले.यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात राजेंद्ररामलाल जयस्वाल आणि त्याची पत्नी स्वाती राजेंद्र जयस्वाल तर दुसऱ्या एका प्रकरणात राजेंद्र जयस्वाल व त्याचा सहकारी मंगेश मधुकर येरणे यांच्याविरुद्ध 420, 406, 468 471, 506, 34 या विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जयस्वाल हाअशाचप्रकारे अनेकांची फसवणूककरीत असून, त्याला त्वरितअटक करून जयस्वाल याच्याफसवणुकीपासून नागरिकांची सुटकाकरण्याची मागणी रितेश व त्याची पत्नी उज्ज्वला गंधारे  यांनी चंद्रपूर येथे पत्रकार संघात आयोजित  परिषदेत केली.
दरम्यान गुन्हे स्क्व्यशिंग साठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे राजेंद्र जयस्वाल यांचे म्हणणे असून दीड टक्के व्याजाचा परवाना असताना दहा टक्के व्याज घेतल्या -दिल्याचे अनेक पुरावे रितेश गांधारे यांचेकडे असून त्याच आधारावर माननीय न्यायालयाने जयस्वाल व इतर सहकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यामुळे, जयस्वाल यांचा वेळकाढूपणाला न जुमानता पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे.