आदर्श शाळेत भारत स्कॉऊट-गाईड' ध्वज दिन ' उत्साहात साजरा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श शाळेत भारत स्कॉऊट-गाईड' ध्वज दिन ' उत्साहात साजरा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

स्थानिक बालवीद्या  शिक्षण प्रसारक मंडळ ,राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथे भारत स्कॉऊट-गाईड ध्वजदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे ,राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले,जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार ,स्कॉऊट यूनिट लिडर रुपेश चिडे आदिंचि प्रामुख्याने उपस्थिति होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला झेन्डा गीत व प्राथनेणे सुरुवात करण्यात आली. रितु दूपारे या विध्यार्थीनी ने ध्वज दिनाचे महत्व विषद केले. गडद निळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी पिवळ्या रंगांमध्ये भारत स्कॉऊट -गाईड संस्थेचे चिन्ह असते. निळा रंग सेवेचा निदर्शक आहे.

आकाश व पानी यांच्या निळ्या रंगांतून विशालता व समानता दर्शवली जाते. आकाश व पानी कोणतेही अपेक्षा न ठेवता व भेदाभेद न करता सतत सर्वांच्या उपयोगी पडत असतात.पिवळ्या चीन्हातील बाहेरील टोकदार तीन पाकळ्या जागतिक स्कॉऊट विभागाच्या निदर्शक आहे.व आतील तीन पाकळ्या या जागतिक गाईड विभागाच्या निदर्शक आहे. मध्यभागी असलेले अशोक्चक्र हे भारताचे प्रतीक आहे. खालील तीन पाकळ्यातील आडवा पट्टा एकता दर्शवितो. मांयवरांंनि आपल्या मनोगतातून स्कॉऊट-गाईड ची पार्श्भुमि आणि महत्व विशद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  गाईड यूनिट लिडर सुनीता कोरडे यांनी केले. सूत्र संचालन सरिता लोहबडे हिने तर आभार रोशनी जाधव या विध्यार्थीनीनी केले.