जिल्ह्यात आणखी एक शेतकरी आत्महत्या उघडकीस : घरीच गळफास स्थितीत आढळले शव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात आणखी एक शेतकरी आत्महत्या उघडकीस : घरीच गळफास स्थितीत आढळले शव

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : ब्रम्हपुरी -

तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथिल शेतकऱ्यानी स्वताच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आत्महत्या शेतकरी इसमाचे नाव देविदास किसनजी बगमारे वय वर्ष 48 असे आहे.
सदर घटना दुपारच्या सुमारास घडली असून आत्महत्या शेतकरी इसम देविदास हा आपल्या राहत्या घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. शेतकरी देविदास त्याच्या मृत्यू पच्छात  पत्नी व नवव्या वर्गात शिकत असलेली एकुलती एक मुलगी असे एकून तीन जण आहेत.शेतकरी देविदासने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे कारण वृत्त लिहेपर्यत कळु शकले नाही.मात्र शेतकरी देविदास हा घरचा कर्ता इसम असल्याने कुटुंबाचा संपूर्ण भार होता.त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.सदर घटनेचा पुढ़ील तपास संबंधित पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.