विद्यार्थिनींना राष्ट्रीय स्तरावर च्या खेळापासून ठेवले वंचित : राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर निवड होऊनसुद्धा खेळता येत नसल्याचा तर तर कधी रेल्वे आरक्षणाचा बहाणा देऊन व्यवस्थाकांची चालढकल, खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची अभाविप ची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विद्यार्थिनींना राष्ट्रीय स्तरावर च्या खेळापासून ठेवले वंचित : राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर निवड होऊनसुद्धा खेळता येत नसल्याचा तर तर कधी रेल्वे आरक्षणाचा बहाणा देऊन व्यवस्थाकांची चालढकल, खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची अभाविप ची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी -


वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी बॅडमिंटन (वुमन) चॅम्पीयनशिप ही अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या विद्यापीठातून नऊ मुलींची निवड करण्यात आली होती. त्यातील तीन मुली स्पर्धेसाठी कोटा येथेे जाण्यासाठी तयार होत्या. खरे तर, त्यांची निवड ही 31 ऑक्टोबर 2019 ला विद्यापीठाच्या संकेतस्थळी जाहीर झाली आणि त्यांना 22 नोव्हेंबरला 2019 ला स्पर्धेसाठी येथून निघायचे होते.

                   

तब्बल महिन्याभराचा वेळ हाती होता. परंतु, या प्रदीर्घ कालावधीत विद्यापीठाकडून त्यांना व्यवस्थापकच उपलब्ध करून देता आला नाही. आधी, चमू व्यवस्थापक म्हणून प्रा. उत्तम देऊळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांनी केवळ तीन मुली तयार आहेत आणि त्यांनाही खेळता येत नाही (तक्रारकर्त्या मुलींच्या बयानानुसार) अशा सबबीखाली त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. 

हे जर खरे असेल, तर या मुलींना स्पर्धेसाठी ज्यांनी निवडले, ते संबंधित लोकं अकार्यक्षम होते का, असा गंभीर प्रश्न येथे उपस्थित होतो. प्रा. उत्तम देऊळकर यांनी असे वक्तव्य करणे, की या मुलींना खेळताच येत नाही, हे विद्यार्थ्यच्या दृष्टीने  अत्यंत गंभीर आहे. कारण विद्यापीठानेच त्यांची निवड केली आहे. याबाबत मी जेव्हा, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे यांना विचारले असता, त्यांनीही ही बाब मान्य केली आणि आपली हतबलता दर्शवली.असे असेल, तर हे विद्यापीठाचे मोठे दुर्दैव आहे. 


दुसरी गंभीर बाब म्हणजे, कल्याणी गजेडीवार, सायली भोयर आणि रोशनी नागपुरे या तीन खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार असतानाही त्यांना अनेक दिवस झुलवत ठेवण्यात आले. तुमची 23 नोव्हेंबरचे रेल्वेचे आरक्षण झाले आहे, पण आम्हाला मॅनेजरच मिळत नाही, असे कारण सांगून डॉ. अनिता लोखंड यांनी त्यांची बोळवण केली. 

शेवटी तर, मॅनजरच नाही तर मी तरी काय करू, असे सांगून त्यांनी रोशन नागपुरे यांचा भ्रमणध्वनी अक्षरश: कापला. या संभाषणाची ध्वनीफित मी अभाविप आणि विद्यार्थ्यनी ऐकली आहे. विद्यापीठ महिनाभर प्रयत्न करूनही आपल्या चमुसाठी मॅनेजर उपलब्ध करून देत नसेल, तर ही काय त्या मुलींची चूक आहे?

आणि यावरही कळस म्हणजे, आधी ठरलेले प्रा. उत्तम देऊळकर यांनी अलगदपणे आपले अंग काढून घेतले आणि या मुलींना खेळताच येत नाही, त्यांना तेथे नेऊन काय करायचे, असे धक्कादायक वक्तव्य केले. त्यानंतर, ठरलेले दुसरे मॅनेजर प्रा. संजय मानकर हेही अगदी वेळेवर या खेळाडूंना वार्‍यावर सोडून, आपण त्यांच्यासोबत जाण्यास असमर्थ आहोत, असे उत्तर देऊन मोकळे झालेत आणि या सार्‍या प्रकारात या विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे हे हतबल असल्यागत आता मी काय करू अशा म्हणत असेल, तर हा शिस्तभंगाचा आणि एवढी गंभीर बाब सहजतेने घेण्याचा कळसच म्हणावा लागेल.
या तिन्ही व्यक्तींच्या मनमानी कारभारामुळे तीन विद्यार्थीनी एका मोठ्या स्पर्धेपासून मुकल्या आहेत. काय होते जाऊ द्या, या मानसितेतून निघण्यासाठी असे प्रकरण कडक कारवाईचे उदाहरण ठरावे, अशी अभाविप विद्यापीठाला विनंती करत आहे. काहीसे असेच प्रकार वारंवार आपल्या विद्यापीठातील क्रीडा विभागात घडत आहेत. अधिकार असताना हतबलतेचे दर्शन हा अभाविप च्या दृष्टीने खूप मोठा गंभीर विषय आहे. संबधितांवर कडक कारवाई व्हावी. अशी मागणी विद्यापीठाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सिनेट सदस्य संजय रामगिरीवर यांच्या मार्फत केली आहे.