कार्यालया तक्रार प्राप्त झाली अाहे घरी जाऊन फिंगर घेणे गंभीर बाब आहे चौकशी करू यात रास्तभाव दुकानदार दोषी असतील तर त्यांचेवर कारवाई होणार-राजेश माकोडे,पुरवठा निरीक्षक , कोरपना
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना - नांदाफाटा
रास्तभाव दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रीक प्रणालीने धान्य वितरण व्यवस्था करीत दुकानदारांचे कमिशन दुप्पटीने वाढविले असे असतांना मात्र कोरपना तालुक्यातील नांदा व नांदाफाट्याच्या रास्तभाव दुकानदारांनी घरोघरी जाऊन रेशनकार्ड धारकांचे अंगठे घेत धान्यचोरी करण्याचा गोरखधंदा सुरू केल्याने आॅनलाईन युगातही काळाबाजार करणे चांगलेच सोयीचे ठरले आहे अनभिज्ञ असलेला अन्नपुरवठा विभागाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
कोरपना तालुक्यातील नांदा व नांदाफाटा येथील रास्तभाव दुकानदार धान्य आल्यावर मोजके दिवसच धान्य वाटप करतात दिवस ठरलेले नसल्याने अनेक शिधापत्रिकाधारक वेळेत धान्याची उचल करु शकत नाही. धान्य वितरण प्रणाली ऑनलाइन असल्याने रास्तभाव दुकानदारा जवळील पॉस मशिनमध्ये धान्यसाठा शिल्लक (स्टाॅक) दाखवितो इथूनच रास्तभाव दुकानदारांचा धान्य चोरीचा गोरखधंदा सुरू होतो.
धान्य न सोडविलेल्या शिधापत्रिकाधारकांचे घरोघरी जाऊन रास्तभाव दुकानदार त्यांचे अंगठे पॉस मशीनवर घेतात शिधापत्रिकाधारकांनी अंगठे घेण्याचे कारण विचारल्यास पुढील महिन्याचे धान्य तुम्हाला देता यावे यासाठी तुमचे अंगठे घ्यावे लागतात असे बतावणी केली जाते असे जयश्री यादव , शमोला हलदर , अतुल मेश्राम , दुधराम जुमनाके , नथ्थू मारबते , आशादेवी सिंह , कल्पना घागरे नकिजा शेख , मेहमुद सिद्दिकी , मंजुषा इंगोले , शालीना रामटेके , अनीता पानघाटे , सलमा खान ,अर्चना सिडाम , उषा नरुले अशा अनेक नागरिकांचे फिंगर घेऊन काहींना आॅक्टोबंर तर काहींना नोव्हेंबर महिन्याचे धान्य दिले नसल्याची खात्रीलायक माहिती आहे.
या पुर्वीही अन्नसुरक्षा योजनेत धान्य अपहार केल्याने नांदा व नांदाफाटा येथील रास्तभाव दुकानदारचे परवाने दोनदा रद्द करण्यात आले होते दोन्ही दुकानदाराने स्टॅम्प पेपरवर भविष्यात काळाबाजारी व अपहार करणार नाही असे शपथपत्र दिले होते या उपरांत सुद्धा सुधारणा दिसत नाही आधुनिक युगात ऑनलाइन पाॅस प्रणालीमुळे शिधापत्रिकाधारकांचे घरोघरी जाऊन अंगठे घेऊन धान्याचा काळाबाजार करणे अधिक सोयीचे झाले आहे या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ असलेला कोरपना तालुक्याचा अन्न पुरवठा विभागाने तत्परतेने कारवाई करावी जेणेकरुन तालुक्यात इतर ठिकाणी शिधापत्रिका धारकांची पिळवणुक होणार नाही.
माझे पतीला अर्धांगवायूचा झटका आल्याने काम करु शकत नाही मुलगा बाहेरगावला मजुरी करुन उदरनिर्वाह करतो. आॅक्टोबंर व नोव्हेंबर महीन्यात किसन गोन्डे यांनी घरी येऊन माझे पतीचे फिंगर प्रिंट घेतले पण धान्य दिले नाही. तुम्हाला पुढील महिन्यापासुन धान्य देणार असे सांगितले शासनाचे एई-पिडिएस या संकेत स्थळावर आमचे नावाने २५ किलो धान्य दोन्ही महिन्यात उचल केल्याचे दर्शविते आमच्या सारख्या अनेक गरिब कुटुंबाची फसगत रास्तभाव दुकानराने केली असल्याने चौकशी करुन कारवाई व्हायला पाहीजे -नकिजा शेख,नांदा