कस्तुरबा रोड वरील जया कलेक्शनला मध्यरात्री आग : संपूर्ण कापडं मालासहित शोरूम जळून खाक : बघा विडिओ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कस्तुरबा रोड वरील जया कलेक्शनला मध्यरात्री आग : संपूर्ण कापडं मालासहित शोरूम जळून खाक : बघा विडिओ

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर –

शहरातील कस्तुरबा मुख्य पेठ मार्गावरील "जया कलेक्शन" या नव्यानेच सुरु झालेल्या एक्सक्लूसिव्ह कपड्यांच्या शोरूम ला  काल  रात्री  मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले.

जया कलेक्शन हे काही महिन्यांपूर्वी सुरू झाले होते, या कापडाच्या दुकानात मध्यरात्री शॉर्ट सर्किट झाल्याने संपूर्ण दुकानचं खाक झालं, शहरातील काही युवक या मार्गावरून जात असताना त्यांना जया कलेक्शन येथून धुराचे लोट बाहेर निघताना दिसले. 

त्यांनी यासंदर्भात अग्निशामक विभागाला माहिती दिली  अग्निशामक विभागाने ताबडतोब ठिकाण गाठत  आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत संपूर्ण दुकानाच जळून खाक झालं.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे