भरधाव अनियंत्रित ट्रक खाली चिरडून वृद्ध ठार ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भरधाव अनियंत्रित ट्रक खाली चिरडून वृद्ध ठार !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

आज दिनांक 30 नोव्हेंबर 2019, सकाळी 11:30वाजताच्या सुमारास  ग्रामीण रुग्णालय राजुरा समोरील आसिफाबाद मुख्य रोडवर रस्त्याने चालत असलेल्या वयस्क इसमाला भरधाव ट्रक ने चिरडल्याची घटना घडली. 


यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सर्विस्तर माहिती नुसार स्थानिक इंदिरा नगर येथील रहिवासी मोहम्मद  हसन मोहम्मद  नसरुद्दीन (वय -75) काही कामानिमित्य शहरातील मुख्य रस्ता असलेल्या आसिफाबाद मार्गावरून पायदळ जात असताना ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव जसवंत सिंग ट्रांस्पोर्ट च्या ट्रक, वाहन क्रमांक एम एच 34 ए बी 0734 भरधाव असताना  चालकाचा ताबा सुटून रस्त्यावर अनियंत्रित होऊन कडेने जात असलेल्या नसरुद्दीन यांना चिरडले. त्यात नसरुद्दिन हे जागीच ठार झाले. 

दरम्यान परिसरात जमाव होऊन पोलिसांनी तात्काळ  वाहन चालक शिवानंद रविदास रामके (35) याला अटक करून मृत शरीर शवविच्छेदनास पाठविण्यात आला असून मो. नसरुद्दीन यांची कौटुंबिक आर्थिक स्थिती लक्षात घेता ट्रान्सपोर्ट मालकाने आर्थिक मदत करण्यास समर्थता दर्शविली आहे.