डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू : वडिलांचा आरोप, तक्रार सादर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू : वडिलांचा आरोप, तक्रार सादर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


जिवती तालुक्यातील पाटण टिटवी येथील कु.रिया मोतीराम मडावी या अडीच वर्षीय चिमुकलीला आज सकाळी 6 वाजता पाटण आरोग्य केंद्रात पालकांनी प्रकृती खराब कारणावरून दाखल केले असता गंभीर स्वरूपामुळे तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून मुलीला ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे हलविण्यास सांगितले. सकाळी 8 वाजता च्या दरम्यान तिला ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे दाखल केले असता कोणतेही डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नव्हते. 


निवासी डॉक्टरांना सूचना दिल्यावर गंभीर स्वरूपाची प्रकृती असूनसुद्धा तब्बल तीन तास उशिराने सकाळी 11 वाजता दरम्यान तिची तपासणी करून तिला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले असता 108क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही दुपारी 3पर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्या दरम्यान च्या (11ते 3) पर्यंत च्या कालावधीत तिची गंभीर परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न न झाल्यानेदरम्यान तिचा मृत्यू झाला. 

या सर्व प्रकारात ग्रामीण रुग्णालय राजुरा येथील डॉक्टर व परिचारिकांच्या हलगर्जी पणामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मोतीराम मडावी, मुलीच्या वडिलांनी केला असून निवासी डॉक्टर व दोन परिचारकांविरुद्ध पोलीस ठाणे राजुरा येथे तक्रार नोंदवून कार्यवाही ची मागणी केली आहे.

दरम्यान या चिमुकलीच्या मृत्यू मुळे ग्रामीण रुग्णालय राजुरा येथील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून अनेक नागरिकांनी सुद्धा संताप व्यक्त करत प्रश्नचिह्न उभा केला आहे.


ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ लहू कुळमेथे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी मुलीच्या पालकांना जिल्हा रूग्णालयात हलविण्याची सूचना केल्यानंतर उशीर लावल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचे सांगत कोणीही डॉक्टर उपलब्ध नसल्याची विचारणा केली असता, तीन डॉक्टर शवविच्छेदनात व्यस्त असल्याचे विचित्र उत्तर दिले.

एकंदरीत प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे निष्पाप बालिकेला आपला जीव गमवावा लागल्याने संताप व हळहळ व्यक्त होत असून, यावर कोणती कारवाही केल्या जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.