भारतीय स्टेट बैक च्या वतीने चावडी मेळाव्याचे आयोजन संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भारतीय स्टेट बैक च्या वतीने चावडी मेळाव्याचे आयोजन संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना प्रतिनिधी:- 
कोरपना तालुक्यातील बालाजी सेलिब्रेशन हाँल गडचांदुर येथे भारतीय स्टेट बैकेच्या वतीने आज दिनांक 16नोव्हेंबर ला चावडी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
या मेळाव्याचे उद्घघाटक संजय भागवतकर रिजनल मैनेजर चंद्रपूर,होते तर अध्यक्ष म्हणून देविदास कुलकर्णी चिफ मनैजर चंद्रपूर,मंचावर प्रमुख पाहुणे नंदकिशोर जोशी, देशपांडे,चिलविलवार,विजय बावणे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या बैकेच्या मेळाव्याला कोरपना तालुक्यातील सर्व भारतीय. स्टेट बैकेचे कर्मचारी वर्ग. उपस्थित होते,तसेच नागरिकाची मोठ्या संख्येने या मेळाव्यात गर्दी दिसत होती. 

या मेळाव्यात बैकेच्या वतीने कर्ज योजना, विमा,मँच्युल फंड,क्रिडेट कार्ड, खाते उघडणे असे विविध प्रकारचे स्टाल लावण्यात आले होते, तसेच पंचायत समिती कोरपना बचत गटातील महीलांन कडून खाद्यपदार्थाचे स्टाल लावण्यात आले होते.भारतीय स्टेट बैक गडचांदुर च्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणार्या खातेदाराचा पुष्पगुच्छ व प्रमापत्र देऊन सत्कार करण्यात आला.हा मेळावा यशस्वी करण्याकरिता सचिन कांबळे,मंगेश रामटेके, प्रितम मेश्राम, यांनी परिश्रम घेतले