हमलावर वाघाला हुसकावून लावण्यात गुराखी यशस्वी परंतु गंभीर जखमी : परिसरात आठवड्याभरात वाघाचा दुसरा हमल्याने वाघाची वाढती दहशत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हमलावर वाघाला हुसकावून लावण्यात गुराखी यशस्वी परंतु गंभीर जखमी : परिसरात आठवड्याभरात वाघाचा दुसरा हमल्याने वाघाची वाढती दहशत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राजुरा तालुक्यातील चिचबोडी शेत शिवारात गुराखी  शामराव भीमा टेकाम(50) हा गाई चरण्यासाठी जोगापूर जंगलात गुरे चारण्यासाठी गेले असता त्याच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला वाघाशी झुंज करून वाघाचा हल्ला परतवून लावल्या नंतर त्या वाघाने गाईवर हल्ला चढविल्याचे पाहून सदर व्यक्ती उर्वरित गाईला घेऊन गावात आला. 


परिसरात वार्ता पसरताच अखिल भारतिय आदिवासी विकास परिषद चे, विनोद गेडाम, महिपाल मडावी,  अंकुश कुडमेथे,नितिन सिडाम ,संतोश मडावी,अमृत आत्राम , मारोती कोरवते ,यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व प्रशासनाला कळविले असून जखमी टेकाम तयांना ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले व प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.