चंद्रपुरात शिवसेनेचा राडा : पक्षादेश झुगारून, चिरीमिरी घेऊन मतदान केल्याचा नगरसेवकांवर आरोप करत कार्यालयासमोर गोधंळ-तणाव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात शिवसेनेचा राडा : पक्षादेश झुगारून, चिरीमिरी घेऊन मतदान केल्याचा नगरसेवकांवर आरोप करत कार्यालयासमोर गोधंळ-तणाव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :शहर प्रतिनिधी -

शिवसेना आणि भाजपाची तीस वर्षाची युती तुटल्यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकासआघाडीच्या नेतृवात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असतानाच आज झालेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर  निवडणुकीत सेनेच्या दोन्ही नगरसेवकांनी भाजपसोबत सलगी साधत, भाजपा उमेदवारांना मतदान केल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या कार्यालयासमोर चांगलाच राडा केला.

राज्यपातळीवर शिवसेना व भाजप मधे मोठे वितुष्ट आले असून  राज्यात स्थानिक स्वराज संस्थेतही याचे पडसाद उमटत आहेत. चंद्रपूर मनपात सुरेश पचारे व विशाल निंबाळकर हे दोन सेनेचे नगरसेवक आहेत.मागील अडीच वर्ष हे दोन्ही नगरसेवक भाजप सोबत होते.

परंतु हे दोन्ही नगरसेवक  मागील पाच दिवसापासून काँग्रेस च्या गटात राहून आज ऐनवेळी निवडणुकीच्या काही तास आधी मोहुर्ली येथे पोहोचले आणि भाजपच्या गोटात सामील होऊन,  मतदान वेळी भाजप च्या बाजूनेच हात वर केला असल्याची माहिती मिळाल्यावर संतप्त स्थानिक कार्यकर्त्यांनी सुरेश पचारे यांच्या तुकूम कार्यालयासमोर जाऊन निषेध नारे देत त्यांच्या  शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचा बोर्ड कढून फेकला.


आज चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीत शिवसेना संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख यांचा आदेश झुगारून भाजप कडून चिरीमिरी घेऊन स्वपक्षासोबत गद्दारी केली असून, सुरेश पचारे व विशाल निंबाळकर यांची पक्षातून ताबडतोड हकालपट्टी करावी अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे- प्रमोद पाटील, महानगर प्रमुख, शिवसेना.

दरम्यान सुरेश पचारे कार्यालयात नव्हते व त्यांनी संदर्भांत माहिती मिळताच पोलिसांना पाचारण केले होते त्यामुळे आज दुपारनंतर तुकूम परिसरात चांगलीच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या सोबत आज सकाळी 9:30 पासून  11वाजत पर्यंत संपर्कात होते.आपण निर्णय द्याल तो मला मान्य असून आपण ज्या उमेदवारास मतदान करण्यास सांगाल आम्ही तिथे मतदान करु तरीही जिल्हाप्रमुखांकडून कोणताही निर्णय न आल्यानंतर शेवटी विकासाच्या मुद्य्यांवर आम्ही भाजपाची सत्ता बसणार याची निश्चिती बघून त्यांना मतदान केले- सुरेश पचारे, शिवसेना नगरसेवक, मनपा, चंद्रपूर.