जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाहन दुर्घटनेतील मृतकांची संख्या वाढली : दुसऱ्या वयोवृद्धाचा मृत्यू : चालकाने पहिल्यांदाच स्टिअरिंग हाथात घेतल्याची धक्कादायक कबुली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाहन दुर्घटनेतील मृतकांची संख्या वाढली : दुसऱ्या वयोवृद्धाचा मृत्यू : चालकाने पहिल्यांदाच स्टिअरिंग हाथात घेतल्याची धक्कादायक कबुली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : (अद्यावत वृत : 11:20AM)जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी 6 वाजता खाजगी वाहनाने  5 नागरिकांना गाडी खाली चिरडले त्यामध्ये मुमताज बेगम (57) यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर इतर 4 गंभीर जखमी पैकी सुधीर गराडे या 70 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतकांची संख्या 2वर पोहोचली असून उर्वरित 2पैकी आणखी एका वृद्धाची  प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
 
फोटो : तिसरे गंभीर जखमी अतिदक्षता विभागात 
वाहन चालक दिनेश बांबोडे याच्याकडे वाहन चालकाचा परवाना नसून पहिल्यांदयाच वाहन चालावयास घेतले व चुकून ब्रेक ऐवजी असिसिलेटर वर पाय ठेवल्याने घटना घडल्याचे कबूल केल्याचे धक्कादायक वृत समोर आले आहे.

------------------------------------------------------------
रुग्णालयातच जीवघेणा थरार -अनियंत्रित खाजगी शववाहिकेने चिरडले : एक महिला ठार -चार जखमी -मद्यपी चालकास तात्काळ अटक  
खबरकट्टा / चंद्रपूर (08:30AM)

आज दिनांक 19 नोव्हेंबर सकाळी 6च्या सुमारास  जिल्हा रुग्णालयासमोर शववाहिका अनियंत्रित होऊन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या रुग्णनातेवाईकांना चिरडले असून, यात एक महिला जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. 

चंद्रपूर शहरात गोपालपुरी भागात  एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.  पहाटेच्या सुमारास तिचा मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला गेला. एक खासगी व्हॅननं वाहन क्रमांक एमएच 34 बीएफ 5815 तो आणला गेला. चालक नवशिक्या होता, शिवाय मद्यप्राशन केलेला होता. 

रुग्णालयात सकाळी लोकांची वर्दळ होती. चालकानं मोठ्या मार्गानं वाहन न टाकता अडचणीच्या जागेतून वाहन फिरवले. अचानक वाहन अनियंत्रित झाले व आवारात उभ्या असलेल्या लोकांना काही सुचायच्या आत त्यांच्यावर जाऊन धडकले व फरफटत गेले  आणि त्यात पाच जण गाडीखाली चिरडले. यात एक महिला गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली. मुमताज शेख असं मृत महिलेचं नाव असून आरोपी चालकास तात्काळ अटक करण्यात आली.हे 5 नागरिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे नातेवाईक होते, सकाळी 6 वाजता ब्रश व पाणी पिण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळचे काम आटोपण्याच्या तैयारीत असताना त्यांच्यावर या वाहनाने अनपेक्षितजीवघेणी झडप घातली.