अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची आमदार भांगडिया व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी केली पाहणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची आमदार भांगडिया व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी केली पाहणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -


                   
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.बंटीभाऊ भांगडिया यांनी आज चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील पारडी-बाळापुर जि.प क्षेत्रातील बाळापूर, देवपायली, सोनूली येथील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेती क्षेत्राची पाहणी केली.

यावेळी आमदार भांगडिया यांनी पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करण्यास संबंधित तालुका प्रशासनास आणि कृषी विभागास सूचना दिल्या.

ज्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना विमा कंपनी मार्फत  आणि ज्यांचा पीक विमा नसेल त्यांना शासन सरसकट त्वरित आर्थिक मदत करणार असल्याचे यावेळी आमदार भांगडिया यांनी सांगितले. विमा कंपन्यांनी पीक विमा देण्यास हयगय करू नये. पीक विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कृषी विभागाने आणि तालुका प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीकोनातून युद्ध पातळीवर कार्य करून संकटग्रस्त शेतकरी यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
       
तसेच त्यांनी यानंतर मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, तळोधी (बा) येथे भेट देऊन यासंबंधी कार्यालयात उपस्थित शेतकरी यांचे समस्या जाणून घेतल्या आणि त्या त्वरित सोडविण्याच्या सूचना मंडळ कृषी अधिकारी यांना दिल्या.
       
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी तापस्कर साहेब, मंडळ कृषी अधिकारी आमले साहेब, नायब तहसिलदार वक्ते मॅडम, भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचेसह भाजपाचे वसंत वारजुकर , नागभीड बाजार समिती सभापती आवेश पठाण, पं.स.सदस्य संतोष रडके, नप बांधकाम सभापती सचिन आकुलवार, माजी सभापती इश्वर मेश्राम,नगरसेवक, शिरीष वानखेडे, डॉ. मदन अवघडे, धनराज बावनकर, राजेश घिये, अशोक ताटकर, भास्कर लोनबळे,  सुनील किटे, टीमु बलदेवा, सरपंच शंकर मेश्राम, खुशाल तुपट, भोजराज नवघडे, कैलास अमृतकर, वेंका भाकरे,  आनंद भरडकर,  आदींसह संपूर्ण  नागभीड तालुका भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.