निमा स्टुडंट फोरम, चंद्रपूर तर्फे उत्तराखंड व महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना निवेदन : प्रशिक्षणार्थी आयुर्वेद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक घटनेचा तीव्र निषेध - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

निमा स्टुडंट फोरम, चंद्रपूर तर्फे उत्तराखंड व महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना निवेदन : प्रशिक्षणार्थी आयुर्वेद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक घटनेचा तीव्र निषेध

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :निमा-नॅशनल इंट्रीग्रेटेड मेडिकल अससोसिएशन स्टुडंट फोरम तर्फे उत्तराखंड सरकार द्वारा आयुर्वेद महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यावर केल्यागेलेल्या हिंसक कार्यवाही बद्दल तीव्र निषेध व्यक्त करुन विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबद्दल त्यांच्या आंदोलनास समर्थन देण्यात आले.

याबबतचे निवेदन आज दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधीकारी डॉ. कुणाल खेमनार यांना श्री घनश्याम भूगावकर, निवासी जिल्हाधीकारी चंद्रपूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच मुख्यमंत्री उत्तराखंड राज्य यांना ना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात खाजगी महाविद्यालयातील आंतरवासिय प्रशिक्षणार्थी(इंटर्न स्टुडंट्स ) यांना शासकीय तसेच शासकीय अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थी याच्या समान अथवा समकक्ष विद्यावेतन द्यावे यांसदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागणी करण्यात आली.


यावेळेस प्रामुख्याने डॉ. संकेत अ.झाडे सह सचिव, निमा स्टूडेंट फोरम, महाराष्ट्र राज्य( अध्यक्ष),डॉ. नरेंद्र मानवटकर (असिस्टंट कोऑर्डिनेटर ),डॉ. यश अकनूरवार, डॉ.प्रफुल्ल वाघ, डॉ.मुकुंद वानखडे विवेक देशमुख, डॉ .सुमित बावणे,निमा स्टूडंट फोरम,चंद्रपुर