चार कोटी रुपये खर्च करुन बांधलेला आवारपुर-कवठाळा मार्ग गेला वाहून : पाच महिन्यांपासून आवाजाही ठप्प - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चार कोटी रुपये खर्च करुन बांधलेला आवारपुर-कवठाळा मार्ग गेला वाहून : पाच महिन्यांपासून आवाजाही ठप्प

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -नांदाफाटा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास 4.26 कोटी रुपये खर्च करून आवारपुर ते कवठाडा या 10 किलोमीटर रस्त्याची दर्जोन्नती करून मे 2019 मध्ये लोकार्पण करून रस्ता आवाजाहीसाठी खुला करण्यात आला जून महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसाने खैरगाव जवळील नाल्याच्या बाजूचा रस्ताच वाहून गेल्याने नाल्याचा प्रवाह बदलला  मागील पाच महिन्यांपासून रस्ता बंद पडला आहे.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाल्यावरील पुलाचे पाइप उन्हाळ्यात साफ केले असते तर अशी नामुष्की ओढवली नसती यासाठी बांधकाम विभागाचे अभियंतेच जबाबदार अाहे  कंत्राटदाराला दुरुस्तीचा विसर पडला असून अधिकारी झोपेत असल्याने ग्रामीणांचे मोठे हाल होत आहे. 


महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अर्थ साहित्य प्रकल्प योजनेतून 4.26 कोटी रुपये खर्च करून आवारपुर ते कवठाळा 10 किलोमीटर लांबीचा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले रस्ता आवाजासाठी खुला झाल्याने गाडेगाव , खेैरगाव , लोहेगुडा , आवारपूर , कवठाळा या ठिकाणच्या नागरिकांना व शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता.

परंतु जून महिन्याच्या अखेरीस पहिल्याच पावसाच्या पाण्याने खेैरगाव जवळील नाल्यावरील पुलाचे पाइप साफ न केल्याने नाल्याच्या कडेचा रस्ताच वाहून गेल्याने आवाजाही पुर्णता ठप्प झाल्याने नागरिकांचा मोठा भ्रमनिरास झाला यासाठी बांधकाम विभागाचे अभियंते जबाबदार आहेत असे अनेकांनी बोलून दाखविले पाच महिने लोटूनही कंत्राटदाराने अजूनपर्यंत रस्त्याची दुरुस्ती केलेली नाहीत नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य अभय मुनोत यांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकार्‍यांकडे केली आहे.
कंत्राटदार -अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्तीचा विसर:
गाडेगाव-भोयगाव रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चंद्रपूरला दुचाकीने येजा करणे त्रासदायक होते कवठाऴा रस्ता नव्याने बनविल्याने नागरिकांची  खड्ड्यांपासून मुक्तता झाली होती खेैरगाव नाल्याजवळील रस्ता वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ कंत्राटदार व अभियंत्यांनी नाल्यावरिल पुलाचे पाइप साफ़ करून फाडी , बोल्डर , गिट्टी व  मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक होते कंत्राटदार व अभियंत्याने याकडे कमालीचे दुर्लक्ष का केले हा मोठा प्रश्न आहे यामुळे परिसरातील शेतकरी व  नागरिकांना फार मोठा त्रास झाला आहे आता तरी सद्बुद्धीने लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आम्ही  करतो आहे -अभय मुनोत, सदस्य ग्रामपंचायत नांदा