जम्मू काश्मीर येथे पर्यटनाला गेलेल्या व्यापाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जम्मू काश्मीर येथे पर्यटनाला गेलेल्या व्यापाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -

नागभीड तालुल्यातील तळोधी (बाळापूर) येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री. अशोक दंडलवार यांचे जम्मु (काश्मीर) येथे आज दिनांक 16 नोव्हेंबर ला ह्दयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.तळोधी येथील अशोका इंजिनीयर वर्क शॉप चे मालक तथा धनश्री पतसंस्थेचे माजी संचालक श्री. अशोक रामभाऊ  दंडलवार (वय५२) यांचे आज दि.16 नोव्हेंबर ला निधन झाले. ते वैष्णो देवी दर्शना करीता गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना जम्मू येथील दवाखान्यात भरती करण्यात आले त्यातच त्यांचे प्राण गेले.

त्यांच्या सोबत त्यांचा परिवार होता.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा,मुलगी, भाऊ बहीण ,जावई असा आप्तपरिवार आहे.त्यांच्या निधनाची बातमी कळताच तळोधी शहरात शोककळा पसरली .