राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आदर्श ग्राम घाटकुळचे आवाहन : नमूद पत्त्यावर पाठवा प्रकाशित साहित्य - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आदर्श ग्राम घाटकुळचे आवाहन : नमूद पत्त्यावर पाठवा प्रकाशित साहित्य

Share This
-ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम 📚

खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा -

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत आदर्श गाव, ग्रामपंचायत घाटकुळ तर्फे राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार या वर्षी पासून देण्यात येत आहे.


करिता सन 2017 ते 2019 या तीन वर्षातील कविता, कथा, ललित, नाटक, समीक्षा, बालसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र  या वाड:मय प्रकारात उत्कृष्ट साहित्य कृतींना राज्यस्तरीय वाड:मय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख 2000 रोख , शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असून आदर्श गाव घाटकुळ आयोजित विषेश कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून या पुस्कारासाठी पाठविलेली पुस्तके घाटकुळ येथील समृद्ध सार्वजनिक वाचनालयात वाचकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.

राज्यभरातील कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंतांना 1 जानेवारी 2017 ते 31डिसेंबर 2019 या दरम्यान प्रकशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रति, छायाचित्र व माहितीकरिता 10 जानेवारी 2020 पर्यंत खालील पत्यावर पाठविण्याचे आवाहन घाटकुळ आदर्श ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता : श्री. अविनाश पोईनकर, (ग्रामपरिवर्तक ) ग्रामपंचायत घाटकुळ, ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर  -442702 संपर्क : 7385866059

सदर माहिती जास्तीत जास्त साहित्यिकांपर्यंत, साहित्यिक समूहापर्यंत पोहोचवून सहकार्य करावे.