व्यापाऱ्यांनकडून शेतकऱ्यांची लुट थांबावी : कवडीमोल भावाने सोयाबीनची खरेदी -हमी भावाच्या मागणीकरिता ग्रामीण पत्रकार संघ, कोरपना ने घेतला पुढाकार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

व्यापाऱ्यांनकडून शेतकऱ्यांची लुट थांबावी : कवडीमोल भावाने सोयाबीनची खरेदी -हमी भावाच्या मागणीकरिता ग्रामीण पत्रकार संघ, कोरपना ने घेतला पुढाकार

Share This
खबरकट्टा / हबीब शेख  प्रतिनिधी - 


कोरपना तालुक्यात सोयाबीन काढणीच्या कामाने आता वेग घेतला आहे. ठिकठिकाणी वादळी वारे व पाऊस पडत असल्याने शेतकरी जास्तीची मजुरी देऊन सोयाबीनची काढणी करीत आहे. काढणीची मजुरी देण्याकरिता अनेक शेतकरी सोयाबीन ओली असतानाच मळणी करीत आहेत. 

त्यानंतर तत्काळ बाजारपेठेत आणून मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करीत आहे. सोयाबीन काढणीकरिता एकरी दोन हजार रुपये व मळणी यंत्राची एक क्विंटल सोयाबीन काढण्याकरिता अडीचशे रुपये द्यावे लागत आहे. तालुक्‍यात भारी शेती असलेल्या ठिकाणी एकरी पाच ते सात क्विंटल, तर हलक्‍या शेतात तीन ते पाच क्विंटल उत्पादन होत आहे. 

खासगी देणी वाढतच आहेत. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याने मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या आठवड्यात सोयाबीनची आवक वाढल्याने गडचांदुर, कोरपना बाजारपेठेत सोयाबीन जास्त ओली असल्याचे कारण सांगून व्यापाऱ्यांनी सोयाबीनची खरेदी एक हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी केली, तसेच क्विंटलमागे दोन किलो कटती कापत आहे. 

शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे तसेच पत्रकार संघाने थोडे सोयाबीन घेऊन तिन चार व्यापाऱ्यांकडे तपासणी साठी घेऊन गेले असता मोठी तफावत आढळून आली.हे माहीत होताच कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी हबीब  शेख प्रकाश ईसनकर,श्रीकांत मोहारे, मुमताज अली,दिपक खेकारे यांच्या पुढाकाराने कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव के.एस देरकर यांच्या सोबत या विषयावर चर्चा करण्यात आली असता सोयाबीन खरेदी विक्री बाजार समितीच्या यार्ड मध्ये लिलाव करण्यात  येईल  तसेच नाफेड व तारण योजना सुरु झाली असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले.


शासनाचे सोयाबीनचे हमीभाव तिन हजार सातशे रुपये असून एवन ग्रेड चा माल खरेदी करणार असून  हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होणार नाही हे निश्चित.