छोट्या दुकानदारांवर कारवाही च्या नावावर छळ करणाऱ्या अन्न व औषध विभागाला जोरगेवारांनी धरले धारेवर : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

छोट्या दुकानदारांवर कारवाही च्या नावावर छळ करणाऱ्या अन्न व औषध विभागाला जोरगेवारांनी धरले धारेवर :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
दिवसेंदिवस वाढत चाललेली बोरोजगारी मुळे शहरात अनेक बेरोजगारांनी लहान-लहान दुकानें थाटली असून यात खाद्य पदार्थांच्या दुकांनांवरही एरव्ही फार रेलचेल दिसते. आता या वरून अन्न व औषध विभागातर्फे छोट्या दुकांदारांवर कारवाईचा बडगा उभारण्याचे काम सुरू आहे, तुकुम परिसरात सकाळी चहा पोहे दुकानदार यांचे अचानक अन्न व औषध विभाग, महानगरपालिका अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासन समवेत कारवाई करण्याचे काम सुरू होते.


अचानक काही कारण नसताना संबंधित विभागाने तुकूम परिसरातील दुकानदारांचे सामान फेकणे सुरू केले, जमलेल्या नागरिकांनी आमदार जोरगेवार यांना याबाबत सांगितले असता आमदार जोरगेवार हे ताबडतोब तुकुम परिसरात दाखल झाले, व संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे कारण विचारले असता यावर ते काही बोलले नाही.आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना समज दिल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे टाळले व त्या परिसरातून निघून गेले, जोरगेवार यांनी या दुकानदारांची चूक असेल तर खुशाल कारवाई करा पण चूक नसतांना या गरीब लोकांना त्रास देऊ नका.

आधीच बेरोजगारांची फौज जिल्ह्यात तैयार होत आहे, मग लहान दुकानदारांनी चोऱ्या करायच्या का असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला.

नागरिकांच्या एका हाकेवर जोरगेवार हे धावून आले याकरिता परिसरातील नागरिकांनी आमदार जोरगेवार यांचे आभार मानले