सरपंचाने केला गावातील महिलेचा विनयभंग : तक्रारीअंती सरपंच नितीन काकडे अटकेत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सरपंचाने केला गावातील महिलेचा विनयभंग : तक्रारीअंती सरपंच नितीन काकडे अटकेत

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :गोंडपिपरी -

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा या गावातील सरपंचाने गावातीलच एका महिलेचा आज दिनांक 20 नोव्हेंबर दुपारच्या सुमारास  दुकानात एकटी पाहून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पिडित महिलेने पोलिसस्टेशनला तक्रार दिली व लगेच पोलिसांनी या गावपुढारी सरपंचाला अटक केल्याने परिसरात खडबड उडाली आहे.

गोंडपिपरी पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या  विठ्लवाडा गावात सध्या स्थितीत नितीन काकडे हे सरपंच आहेत.दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आपल्या घराशेजारील महिला स्वतःच्या किराणा दुकानात एकटी बसली असता पाहून सरपंच नितीन काकडे हे सामान घेण्याच्या निमित्ताने दुकानाच्या आवारात प्रवेश केला.एकटी असल्याची संधी सादत सदर महिलेचा विनयभंग केला.लागलीच महिलेने ओरडाओरड केली.अन आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले.

क्षणाचाही विलंब न करता पीडित महिलेने गोंडपिपरी पोलिस स्टेशन गाठले.झालेल्या प्रकाराची तक्रार पोलिस स्टेशनला दिली.सदर प्रकरणी सरपंच नितीन काकडे यांचेविरूद्ध गुन्हा क्रमांक 304/19, आयपीसी कलम 354अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.अधिक तपास गोंडपिपरीचे ठाणेदार संदिप धोबे करित आहेत.