धानकापणीत महिलेला सर्पदंश : रुग्णालयात नेण्याच्या तयारीत असतानाच दंश-जहर चढून मावळली प्राणज्योत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धानकापणीत महिलेला सर्पदंश : रुग्णालयात नेण्याच्या तयारीत असतानाच दंश-जहर चढून मावळली प्राणज्योत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सावली -

सावली तालुक्यातील रैयतवारी येथे धान कापणी साठी महिला गेल्या असता शीला पुरुषोत्तम वासेकर (वय 35 वर्ष ) सर्प दंश होऊन म्रुत्यु झाल्याची घटना आज 22 नोव्हेंबर रोजी घडली.

सध्या शेतीची धान कापणे, व बांधनीची कामे जोरात सुरू आहे.  नेहमीप्रमाणे रैय्यतवारी गावातील महिला सकाळच्या 10 च्या सुमारास महिला धान कापणीसाठी गेल्या. त्यातच मृतक महिला शीला वासेकर या सुद्धा गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्याच शेतातील धान कापणीसाठी गेली. 


धान कापणी करत असताना दुपारी 01.45 च्या वेळेस काहीतरी चावल्याचा भास झाला त्यानंतर सविस्तर पाहणी केली असता तिला सर्पदंश केल्याचे आढळून आले. त्यानंतर लगेचच तिला गावाकडे आणण्यात आले परंतु गावात आणल्यानंतर लगेचच रुग्णालयात नेण्याच्या तयारीत असतानाच सदर महिलेची प्राणज्योत मालवली, संपूर्ण परिवार व गावावर शोककळा पसरली. सदर महिलेला 02 लहान-लहान मुले आहेत.