मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरेच ! शरद पवारांचं स्पष्ट विधान - संजय राऊतांची पक्ष स्पष्टोक्ती ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरेच ! शरद पवारांचं स्पष्ट विधान - संजय राऊतांची पक्ष स्पष्टोक्ती !

Share This
उद्धव ठाकरेंनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा आग्रह स्वीकारला आहे. संजय राऊत यांनी याबाबत स्पष्ट केले की राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यास उद्धव ठाकरे तयार आहेत. बैठकीत उपस्थित नेत्यांचे उद्धव ठाकरेंना समर्थन दिले आहे.

खबरकट्टा / महाराष्ट्र :

महाविकासआघाडीच्या मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या त्याचे आता अंतिम स्वरुप समोर येत आहे. जर शरद पवारांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार तर त्यावर शिवसेनेचे काय स्पष्टीकरण हवे असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसणार आहेत. परंतू यावर कोणत्याही पक्षांकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
आज पार पडलेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व सहमती झाल्याचे सांगितले. बैठकीतून बाहेर आल्यावर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार याचा खुलासा केला आहे. मात्र इतर मुद्यावर अद्यापही चर्चा सुरु असल्याचे पवारांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले की नेतृत्वाबाबत आमच्यात दुमत नाही, उद्धव ठाकरेंच्या नावाला आमच्यामध्ये सर्व सहमती आहे. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. चर्चा सुरु होती ती मुख्यमंत्रिपदी कोणाला बसवणार. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांची आज मुंबईत संयुक्त बैठक पार पडली. या दरम्यान शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवल्याचे वृत्त होते. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असे म्हणत पवारांनी उद्धव ठाकरेंना प्राधान्य दिसल्याचे कळत होते.