मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांच्या नावाला पर्याय : मुख्यमंत्री पद वाटून घेण्यास भाजपा तयार? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांच्या नावाला पर्याय : मुख्यमंत्री पद वाटून घेण्यास भाजपा तयार?

Share This
खबरकट्टा :महाराष्ट्र -


विधानसभा 2014ची मुदत संपत येत असून राज्यात विधानसभा  2019 निवडणुकीचा निकाल लागून 12दिवस लोटल्यावरही महायुतीत खुर्ची संघर्ष कायम असताना, शिगेला पाहोचलेला हा संघर्ष अखेर भाजपाने शिवसेनेच्या सत्तेची समसामान वाटणी या अडत्यावर मार्ग काढला असून मुख्यमंत्री पद अडीच -अडीच वर्ष वाटून घेण्याच्या मुद्द्यावर सहमती दर्शवत सत्ता स्थापनेची तयारी दर्शविल्याने साम टीव्ही वर वृत्त झळकत आहे.


परंतु सत्तेच्या या चर्चा वाटाघाटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव एकटे पडल्याचे चित्र अनेकदिवसापासून घडामोडी तुन स्पष्ट होत असल्याने पर्यायाने आता चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांच्याही नावाचा विचार सुरु असल्याचे चर्चेत आहे.
बातमी संदर्भ : sam tv, दिनांक 5नोव्हेंबर 2019विधिमंडळ नेते पदी फडणवीस यांची निवड झाली असली तरीही दुसऱ्यांदा नेता निवडता येतो.पक्ष श्रेष्ठीं आता फडणवीस यांच्यावर खफा वाटत आहेत. त्यामुळेच आता मुख्यमंत्री  बदलणार हे जवळ जवळ नक्की वाटतंय.सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आता सर्वात आघाडीवर आहे. मुनगंटीवार गडकरींचे कट्टर समर्थक असल्याने देखील त्यांचं नाव आता अधिक चर्चेत आहे.