जाहीर सूचना :मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जोगापूर यात्रेवर काही निर्बंध : वमविभागाच्या कॅमेरा ट्रॅप मध्ये चार प्रौढ वाघांचे वास्तव्य आढळून आले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जाहीर सूचना :मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जोगापूर यात्रेवर काही निर्बंध : वमविभागाच्या कॅमेरा ट्रॅप मध्ये चार प्रौढ वाघांचे वास्तव्य आढळून आले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -जाहीर सूचना 


राजुरा तालुक्यातील मौजा जोगापूर हे एक रिठ गाव आहे,गावाच्या सभोवताली 10300 हेक्टर सलग भारतीय वन अधिनियम 1927  च्या व्याख्येनुसार वनांमध्ये हे समाविष्ट आहे.सदर वन जैवविविधतेने परिपूर्ण नटलेले आहे याच वनविभागातील कॅमेरा ट्रॅप मध्ये चार प्रौढ वाघांचे वास्तव्य आढळून आले आहे,सदर परिसरामध्ये दि.18/01/2019 ला वाघाच्या हल्ल्यामध्ये एक महिलेचा बळी गेल्याची घटना घडली होती.
नुकतीच दि.25/11/2019 ला याच परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यात मौजा मूर्ती येथील एका इसमाचा मृत्यू झाला आहे.म्हणून मार्गशिष महिन्यात जोगापुर यात्रेला एक ते दीड लाख भाविक येत असतात,तसेच शनिवार,रविवार,सोमवार या दिवशी भाविकांकडून तिथे जेवणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात,म्हणून भाविकाकडून व इतर मनोरंजनात्मक दुकानाकडून प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे वन्य प्राण्यांसाठी जवळच असलेले पाणवठे मोट्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत,याचा परिणाम जैवविविधतेवर व पर्यावरणावर होताना दिसत आहे.त्यामुळे वन्यजीवांना व जैवविविधतेला धोका निर्माण होऊन मानव व वन्यजीवामध्ये संघर्ष निर्माण होत आहे असल्याचे निदर्शनास येत आहे म्हणून भविष्यात मानव व वन्यजीव हा संघर्ष टाकण्यासाठी काही यात्रेवरील भाविकांसाठी निर्बंध घातले आहेत ते खालीलप्रमाणे..

1) खाजगी वाहनांना प्रवेश बंद, एसटी महामंडळ बससेवा परवानगी देण्यात आली आहे.
2 ) सहभोजन किंवा भोजन बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
3 ) वनपरिक्षेत्र फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
4 ) वनपरिक्षेत्रा मध्ये फोटो काढण्यास बंदी.
5 ) वनपरिक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा व प्लास्टिकच्या वापरास बंदी.
6 ) तलावामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्माल्य टाकण्यास बंदी घातली आहे.

अश्या सूचना उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव व तहसिलदार राजुरा डॉ.रवींद्र होळी यांनी परिपत्रक जाहीर करून राजुरा तालुका परिसरातील नागरिकांना केली आहे.